
नागपूर : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजनेसाठी पात्र व्यक्ती आणि संस्थांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी यांनी केले.

मध केंद्र योजना सुरू करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदान स्वरूपात देण्यात येईल व ५० टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल. शासनाच्या हमीभावाने मध खरेदी करण्यासोबत मधमाश्या संरक्षक व संवर्धन याबाबत मोफत प्रशिक्षण व जनजागृती मंडळामार्फत करण्यात येते. वैयक्तिक मधपाळ प्रशिक्षण घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा आणि वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल.
