
बालिंगा: बालिंगा,ता. करवीर येथील विद्यामंदिर बालिंगे मधील सर्व विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते आनंद जाधव यांच्यावतीने शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये ज्यामध्ये, वह्या,पेन,कंपास, पेन्सिल, सॅक, पाण्याची बाटली इत्यादी साहित्याचा समावेश होता.

या वेळी बोलतांना त्यांनी सांगितले की,माझीमुले ज्या वेळी शाळेला जात होती त्यावेळी त्यांना चॉकलेटही घेवून देवू शकलो नाही,त्याची खंत अजूनही माझे मनात आहे म्हणून या साहीत्या बरोबर मी चॉकलेट ही मुलांना देताना माझा कंठ भरुन आला आहे. असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी स्वागतपर भाषणात मोहन कांबळे यांनी , गावाकरील ते राव काय करील अशी एक म्हण होती परंतु आज त्याला छेद देत आनंद जाधव या रावानेच आज हे सर्व शालेय साहित्याचे मोफत वाटप करून समाजापुढे एक पाऊल पुढे टाकले आहे. तसेच या वेळी ताज मुल्लाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून गावच्या नावाचा लौकिक करावा असे सांगितले.
सदर साहित्याचे वाटप महिपतराव बोंद्रे पतसंस्थेचे चेअरमन पंडितराव बौंद्रे, करवीर चे मंडळ अधिकारी संतोष पाटील, अमर पाटील शिंगणापूरकर,विजय पोवार, धनंजय ठेंगे, अजित कांबळे, प्रकाश जांभळे, दशरथ वाडकर, सौ.अंजना माळी, डॉक्टर अनिल कांबळे, राजेंद्र चौगले, ग्रामसेवक शिवाजीराव वाडकर, युवासेना अध्यक्ष अजय वाडकर , राजु चव्हाण,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमर यादव,माजी सरपंच प्रकाश माळी, विकास जांभळे, यांच्या हस्ते शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
त्याच वेळी शाहु प्रेरणा पुरस्कार मिळाले बध्दल मोहन कांबळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विद्या मंदिर बालिंगे येथील पहिली ते पाचवी चे सर्व विद्यार्थी, बालिंगा ग्रामस्थ, अजिंक्य कोरे, इम्रान सय्यद, आशिष कुमार ढेंगे, प्रशांत चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती व गावातील सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.सदर कार्यक्रम विठ्ठल मंदिर येथे सकाळी ११वाजता पार पडला या वेळी विद्यार्थी व पालक यांचे डोळ्यामध्ये समाधान होते.
