मोफत रेशन बंद होण्याची शक्यता

मुबंई : केंद्र सरकारने रेशनबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.सरकारने ओपन मार्केट सेल स्कीम अंतर्गत राज्य सरकारांना देण्यात येणाऱ्या गहू आणि तांदूळाची विक्री थांबवली आहे.मोदी सरकारच्या या निर्णयाचा परिणाम कर्नाटकसह काही राज्यांवर होण्याची शक्यता आहे. कारण, केंद्र सरकारकडून राज्यांना मिळणारा गहू आणि तांदूळ बंद होणार असल्याने मोफत रेशनही बंद होण्याची शक्यता आहे.

भारतीय अन्न महामंडळाने जारी केलेल्या आदेशानुसार, राज्य सरकारांना डोमेस्टिक अंतर्गत गहू आणि तांदूळ विक्री बंद करण्यात आली आहे. केंद्राकडून या निर्णयाची माहिती कर्नाटक सरकारला आधीच देण्यात आली होती.

🤙 8080365706