सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले, तरी बीआरएस पक्ष त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; हर्षवर्धन जाधव

तेलंगणा : राज्यातील शेतकऱ्यांच्या सडून रस्त्यावर फेकून दिला जाणारा कांदा आम्ही बीआरएसच्या माध्यमातून तेलंगणात विकून दाखवला. कारण महाराष्ट्रातला शेतकरी जगला पाहिजे ही आमची भूमिका आहे. यापुढे देखील राज्यातील सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले, तरी बीआरएस पक्ष त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वास माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला.

खरतरं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणे हे या सरकारचे काम होते, कारण शेतकरी महाराष्ट्रातला होता. आम्ही विनंती केली, आंदोलन केले पण सरकारच्या वतीने कांदा खरेदी केली जाणार नाही, असे स्पष्ट सांगण्यात आले होते. त्यामुळे या अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादकांना चांगला भाव मिळवून देण्यात आणि त्यांचा कांदा तेलंगणात विकण्यात आम्हाला यश आले आहे, असा दावा जाधव यांनी केला.

🤙 8080365706