
मुंबई : केंद्र सरकारने आजपासून सोयाबीन आणि सूर्यफुलावरील आयात शुल्कात 5 टक्क्यांची कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

सोयाबीन आणि सूर्यफूल हे तेलवर्गीय पिकांमध्ये सर्वाधिक मागणी असलेले पिकं आहेत. मात्र, यावर्षी आता दोन्ही पिकांचे भाव पडण्याची शक्यता निर्माण झाली आहेत. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय यासाठी कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. केंद्र सरकारने आजपासून सोयाबीन आणि सूर्यफुलावरील आयात शुल्कात 5 टक्क्यांची कपात करीत ते 17.5 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांवर आणले आहे. यामुळे परदेशातून या दोन्ही उत्पादनांच्या आयातीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
