
मुंबई : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांना भाजपाने, जनतेने स्वीकारले आहे. ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही. शिंदेंना त्यांचे सल्लागार चुकीचे सल्ले देत असतील. उद्धव ठाकरेंना मुंबई म्हणजे महाराष्ट्र वाटत होता. आता शिंदेंना वाटायला लागला आहे, असे अनिल बोंडे म्हणाले. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही, अशा शब्दांत भाजपा नेते अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.

