
पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपोरजॉय चक्रीवादळामुळे खोळंबलेल्या मान्सूनने केरळमध्ये आगमन केल्यानंतर अवघ्या ४८ तासांतच महाराष्ट्रात जोरदार आगमन केले आहे.

दरम्यान, येत्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.मान्सूनने संपूर्ण सिंधुदुर्ग, गोवा, तसेच रत्नागिरी आणि कोल्हापूरचा काही भाग व्यापला आहे. मान्सूनची प्रगतीची उत्तर सीमा रत्नागिरी, शिवमोगा, हासन, धर्मपुरी, श्रीहरिकोटा आणि धुबरी येथून जात आहे. येत्या ४८ तासांत आणखी प्रगती होणार आहे.
