आज पासून टाळ- मृदंगाच्या गजरात आषाढी वारीला सुरुवात

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ओढ असलेला आषाढी वारीला आजपासून टाळ आणि मृदंगाच्या गजरात सुरुवात होणार आहे. देहू शहरातून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे.

त्यासाठी देहू नगरीत शेकडो वारकरी दाखल झाले आहे. जय हरी विठ्ठलाचा गजर करत वैष्णवाचा मेळा भरला आहे. दरवर्षी वारकरी या दिवसाची वाट बघत असतात. आज हा प्रस्थान सोहळा वारकरी याची देही याची डोळा बघणार असल्यानं आणि वारीत सहभागी होणार असल्यानं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष आहे. जेष्ठ वद्य सप्तमी शनिवार दि. 10 जूनला पालखी प्रस्थान दुपारी 2 वाजता होणार असून पालखीचा पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात होणार आहे. रविवार 11 जूनला पालखी सकाळी 10.30 वाजता येथील इनामदार वाड्यातून निघून औद्योगिक नगरीकडे आकुर्डी येथील दुसऱ्या मुक्कामासाठी रवाना होईल.सोमवार 26 जून रोजी सकाळी धावा व रात्री पालखी मुक्काम पिराची कुरोली येथे होईल. मंगळवार 27 जून रोजी बाजीराव विहिर येथे उभे रिंगण आणि रात्री वाखरी येथे मुक्काम होईल.

🤙 8080365706