तरुणांनी आता जागे व्हावे; सत्यजित तांबे

नाशिक : राज्यात सर्व जाती धर्माच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आपली परंपरा आहे. या परंपरेला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. मात्र सद्यस्थितीत तरुणांचा वापर राजकीय स्वार्थासाठी सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. मात्र तरुणांनी आता जागे व्हावे, चांगेल काय, वाईट काय ते बघावे, असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठक घेतल्यानंतर त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी शिक्षण विभागात बोकाळलेला भ्रष्टाचार ते जाती धर्माच्या नावाने सुरु असणाऱ्या हिंसक आंदोलनात तरुणांचा सहभाग अशा विविध विषयांवर आपली मतं व्यक्त केली. सर्वच राजकीय पक्षांनी तरुणांचा राजकारणासाठी वापर केल्याचा आरोप सत्यजीत यांनी केला असून तरुणांनी भरकटत न जाता, जागे व्हावे, चांगले वाईट ओळखावे असे आवाहन केले आहे.

🤙 8080365706