गणपतीपुळे समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ

रत्नागिरी : गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर देशभरातून पर्यटक येतात अन् पर्यटनाचा आनंद लुटतात. परंतु सध्या गणपतीपुळे समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली आहे. हे पाणी चौपाटीवरील दुकानांत शिरले आहे. चक्रीवादळामुळे हा बदल झाला आहे.

रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रकिनारी पाण्याची पातळी वाढली आहे. समुद्राचे पाणी अचानक किनाऱ्यापर्यंत आले आहे. हे पाणी अगदी गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहचले आहे. यामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. पर्यटकांचे सामान देखील वाहून गेले आहे. बिपोरजॉय या चक्रीवादळामुळे समुद्रातील अंतरप्रवाह बदलले आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आले आहे.

🤙 8080365706