बालिंगा मंडल मध्ये शासन आपल्या दारी योजनेस हजारोंचा प्रतिसाद

बालिंगा : ता.करवीर येथील मंडल विभागामध्ये शासन आपल्या दारी या योजनेचा प्रारंभ आज रोजी लिंबाई हॉल इथे गट विकास अधिकारी करवीर तसेच कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक अनिल पाटील, राष्ट्रवादी उपाध्यक्ष मधुकर जांभळे, बालिंगा सर्कल निल काटकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आला. या योजनेमध्ये बालिंगा सर्कलमधील तलाठी ,कोतवाल, कंम्प्युटर ऑपरेटर या सर्वांनी सहभाग नोंदवून जवळपास लाभार्थ्यांचे 900 पेक्षा जास्त दाखले निर्गमित करण्यात आले आहे.

यामध्ये उत्पन्नाचे दाखले 308 जातीचे दाखले 21 सातबारा उतारे जवळपास 353 संजय गांधी मंजूर प्रकरणी 35 तसेच अनेक लाभार्थ्यांना यातून एकाच दिवशी वेगवेगळ्या दाखल्याचा लाभ मिळाला आहे.

यावेळी बालिंगा सर्कल मध्ये येणाऱ्या गावातील महिला भगिनींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येत होता. प्रशासनाने वातावरणाचा विचार करता लिंबाई हॉलमध्ये कार्यक्रम घेऊन लोकांची अल्पोपहार व पाणी त्याची चोख व्यवस्था सरकल ऑफिसर अनिल काटकर ,तलाठी किरण पाटील ,कोतवाल रघुनाथ कांबळे यांनी केल्याने उपस्थित लाभार्थी मधून समाधान व्यक्त केले जात होते. असेच कार्यक्रम वारंवार झाले तर शासन दरबारी लाल फिती मध्ये अडकणारे कामे यांची निर्गत चांगले होईल असे सर्वांना मनोमन वाटत होते. या कामी करवीर चे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला निमंत्रक म्हणून सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग ,सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, पोलीस पाटील ,कोतवाल ,रास्त भाव धान्यदुकानदार, महात्मा गांधी तंटामुक्त कमिटी, सर्व सहकारी संस्था प्राथमिक व माध्यमिक शिक्षकवृंद या कार्यक्रमास हजर होते.

🤙 8080365706