कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला त्याला जबाबदार कोण याचा शोध घेतला पाहिजे : अजित पवार

मुंबई :  सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला,  जो दंगा झाला  त्यासाठी कोण जबाबदार आहे याचा सरकारने शोध घेतला पाहिजे. त्याचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

एका आक्षेपार्ह स्टेट्सवरून कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. या हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली. त्यानंतर प्रचंड मोठा मोर्चा काढला. जमावबंदीचे आदेश झुगारून हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हजारो लोक मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा सुरू असतानाच आंदोलकांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी अखेर या मोर्चावर लाठीमार केला. पोलिसांच्या लाठीमारामुळे एकच गोंधळ उडाला या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार आज माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी या राड्यामागे नेमका कोणाचा आहात आहे, काय हेतू आहे याचा सरकारने लवकरात लवकर शोध लावावा, अशी मागणी केली. अफवा पसरवून दंगल घडवण्याचा घाट घातला जात आहे असा आरोपही त्यांनी केला.

🤙 8080365706