
कोल्हापूर : राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये माझी वसुंधरा ३.०० हे अभियान राबविणेत आले यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सदर अभियानामध्ये कोल्हापूर जिल्हयातील १०९६ ग्रामपंचायतींनी भाग घेतला होता. सदर अभियानांतर्गत टुलकिट नुसार डेस्क टॉप असेसमेंट करिता (भूमी, जल, वायू, अग्नि व आकाश या निर्सगाशी संबंधित पंचतत्वावर आधारित) ग्रामपंचायतींसाठी ७५०० गुण ठेवणेत आलेले होते. अभियान कालावधीमध्ये केलेल्या कामांचे डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमापन त्रसस्थ यंत्रणेमार्फत करणेत आले.
माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत उच्चतम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांचा मुंबई येथे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांचे अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत माझी वसुंधरा अभियान ३० मध्ये राज्यस्तरावर ५०००-१०००० या लोकसंख्येचा गटामध्ये ग्रामपंचायत धरणगुत्ती ता. शिरोळ या ग्रामपंचायतीला व्दितीय क्रमांकाचे रक्कम रुपये १.२५ कोटी रुपयांचे पारितोषिक देऊन सरपंच, ग्रामसेवक व माझी वसुंधरामध्ये काम करणारे पदाधिकारी यांना गौरविणेत आले.
विभागस्तरावर पुणे विभागामध्ये ग्रामपंचायत वाटंगी ता. आजरा या ग्रामपंचायतीस रक्कम रुपये ५०.०० लक्ष इतक्या रक्कमेचे बक्षीस जाहीर झालेले आहे. तसेच विभागास्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये पुणे विभागामध्ये सातारा आणि कोल्हापूर यांना विभागून प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला .
जिल्हा परिषद कोल्हापूरने माझी वसुंधरा अभियान ३.० मध्ये राज्य व विभाग स्तरावर मिळविलेल्या यशामध्ये जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) अरुण जाधव शिरोळ पंचायत समिती गटविकास शंकर कवीतके आजरा पंचायत समिती गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे यांनी व त्यांचे संपूर्ण टिमने यशस्वीपणे काम केले.
