
दिवसभरात किती साखर खाल्ली पाहिजे ? साखर कोणत्या पद्धतीने खाल्ली पाहिजे ? दिवसाला किती आणि कशी साखर खाल्ली तर आपण आजारापांसून लांब राहू शकतो. चला पाहुयात.

दिवसभरांतून किती चमचे साखर खावी याबाबदल सांगताना म्हणतात की, WHO च्या अहवालानुसार, दिवसभरातील डाएटमध्ये ५ ते १० % साखर असणे गरजेचे असते. ही साखर नैसर्गिक असणेही आवश्यक आहे. म्हणजे दिवसातून आपण ६ ते १२ चमचे साखर खाऊ शकता. मग ही साखर आपण चहा – कॉफी, उन्हाळ्यात प्यायली जाणारी सरबते, तसेच फळातून मिळणारी नैसर्गिक साखर अशा विविध पद्धतीने खाऊ शकतो.
1चहा-कॉफीमध्ये साखर घालणे टाळून स्वीटनर्स घेऊ नका, कारण ते शरीरासाठी खूप घातक असतात. २. चहा कॉफीमधून साखर घेताना त्याचे प्रमाण योग्य ठेवा. गरजेपेक्षा जास्त साखर घालणे टाळावे. ३. घरगुती पदार्थात लाडू, खीर यासारखे पदार्थ खाताना ते प्रमाणापेक्षा जास्त गोड असू नयेत. ४. प्रत्येकी ऋतूंत येणारी ताजी फळे खाण्याला प्राधान्य द्या. अगदी आंबा देखील मनसोक्त खा.
