शासन आपल्या दारी’ कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चोख नियोजन करा: राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : शासन आपल्या दारी अभियानाचा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 11 जून रोजी तपोवन मैदानात होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चोख नियोजन करावे, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केल्या.

शासन आपल्या दारी अभियानांतर्गत तपोवन मैदानात होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात लाभ वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी एकत्रितपणे तपोवन मैदानाची पाहणी केली.यावेळी महानगरपालिका उपायुक्त रविकांत अडसूळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील हजारो नागरिक उपस्थित राहतील. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करा. त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी, फिरते स्वच्छतागृह आदी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्या. मैदानावर व व्यासपीठावर विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कार्यक्रमाच्या सुरुवातीला व संपल्यावर नागरिक बाहेर पडताना गर्दी होवू नये व वाहतूक कोंडी होवू नये यासाठी योग्य नियोजन करा. नागरिकांची संख्या लक्षात घेऊन प्रशस्त वाहनतळाची व्यवस्था करा, अशा सूचना क्षीरसागर यांनी केल्या.

🤙 8080365706