
कोल्हापूर : वाढता उन्हाळा व आगामी काळातील पाऊस लक्षात घेवून मंडपाची आखणी करा ,कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या आहेत.

शासन आपल्या दारी अभियानांतर्गत तपोवन मैदानात होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी एकत्रितपणे तपोवन मैदानाची पाहणी केली.यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, वाढता उन्हाळा व आगामी काळातील पाऊस लक्षात घेवून मंडपाची आखणी करा. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी अशा सूचना नागरिक, लाभार्थी व मान्यवरांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करा. कार्यक्रम स्थळी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करा. कार्यक्रम मंडपात येण्यासाठी प्रवेशद्वार, प्रवेशद्वारावर संरक्षण स्कॅनर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व अन्य आवश्यक त्या सुविधा द्याव्यात. कार्यक्रमास उपस्थित राहणारे नागरिक व अतिथींच्या वाहनांकरिता स्वतंत्र वाहनतळ करा, अशा सूचना त्यांनी केल्या.यावेळी महानगरपालिका उपायुक्त रविकांत अडसूळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
