अंबाबाई मंदिरात वडाच्या झाडाला आग

कोल्हापूर :आज वटपौर्णिमेचा सण महाराष्ट्रात सर्वत्र ठिकठिकाणी साजरा केला जातो.कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या परिसरात असलेल्या वडाच्या झाडाला महिलांकडून पूजा सुरू असताना आग लागली होती.

आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने आजच्या दिवशी विवाहित महिला वडाच्या झाडाला फेऱ्या मारून दोर बांधून वडाच्या झाडाची पूजा करतात. अशाच महिला कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या वडाच्या झाडाची पूजा करत असताना उदबत्ती आणि कापूरमुळे या वडाच्या झाडाला बांधलेल्या दोऱ्याला आग लागली आणि वडाचे झाड पेटले.यावेळी लगेचच अग्नीरोधक मशीनच्या साह्याने ही आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.महिलांची मात्र यावेळी मोठी तारांबळ उडालेली दिसली.

🤙 8080365706