टिफीनमधून येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी उपाय

आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही टिफीनमधून येणारी दुर्गंधी प्रभावीपणे दूर करू शकता. ते उपाय कोणते हे जाणून घेऊया.

टिफिन किंवा जेवणाच्या डब्यातून येणारा तिखट वास दूर करण्यासाठी कच्चा बटाटा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. एक कच्चा बटाटा घ्या आणि त्याचे जाड काप करून ते टिफिनवर चोळा अथवा टिफीनच्या आतल्या बाजूने घासून घ्या. जेथून वास तीव्र येतो, तेथे जास्त वापर करा. बटाट्यामध्ये असलेले नैसर्गिक एन्झाईम वास निष्प्रभ करण्यास मदत करतात. बटाटा चोळल्यानंतर त्याचे काप टिफिनच्या आत ठेवा आणि झाकण बंद करा.

त्यानंतर डब्यातूनल बटाटा काढून टाका आणि कोमट पाण्याने डबा स्वच्छ धुवा. उरलेला वास घालवण्यासाठी साध्या लिक्विड सोपने डबा पुन्हा एकदा धुवून घ्यावा. स्वच्छ झाल्यावर टिफिन पूर्णपणे कोरडा करून घ्यावा. याने वास कमी होण्यास मदत होईल.

वापरण्यात आलेल्या लिंबाच साले फेकून न देता गोळा करा व ते पूर्णपणे स्वच्छ धुवा. रिकाम्या टिफिनमध्ये लिंबाची काही साले टाका आणि झाकण घट्ट बंद करून रात्रभर तसेच ठेवा. लिंबाची साले डब्यातील वास शोषून घेतील. टिफिनला उग्र वास येत असेल तर तुम्ही लिंबाच्या सालींचा नैसर्गिक स्क्रब म्हणून वापर करू शकता. तीव्र वास असलेल्या भागांवर लक्ष केंद्रित करून, टिफिनच्या आतील भागा सालाने घासून घ्या. लिंबाच्या अम्लीय गुणधर्मांमुळे दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.

दालचिनी ही आनंददायी सुगंध आणि नैसर्गिक दुर्गंधीनाशक गुणधर्मांसाठी ओळखली जाते. ज्यामुळे टिफिनमधील तीव्र गंध दूर करण्यासाठी ती एक प्रभावी घटक ठरते. त्यासाठी रिकाम्या टिफिनमध्ये एक किंवा दोन दालचिनीच्या काड्या ठेवून झाकण घट्ट बंद करावे. दालचिनीची काडी तीव्र गंध शोषून घेते व डब्यात सुगंध राहतो. किंवा तुम्ही दालचिनीची पावडरही वापरू शकता. टिफीनमध्ये दालचिनीची पावडर टाकून झाकण घट्ट लावा आणि डबा हलवा. त्याने गंध शोषला जाईल. नंतर डबा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. दालचिनी पावडर आणि लिंबाता रस याची पेस्ट लावूनही डबा स्वच्छ करता येतो. त्यामुळे डब्यातील तीव्र वास जाऊन दुर्गंध हळूहळू कमी होतो.

🤙 8080365706