मीरा वेलणकर दिग्दर्शित ‘ बटरफ्लाय ‘ 2 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला

कोल्हापूर : ज्या वेळी एखाद्या व्यक्तीला आपल्या जगण्याचा उद्देश गवसतो त्या वेळी आयुष्यात अशी एक घटना घडते ज्याने आयुष्याला पूर्णपणे कलाटणी मिळते.त्यावेळी पडणाऱ्या एका छोट्याश्या ठिणगीने आयुष्याला लखलख लाइटिंग कसं होत ह्याची गोष्ट सांगणारा मीरा वेलनकर दिग्दर्शित “बटरफ्लाय” हा चित्रपट येत्या 2 जूनला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची माहिती अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रत्येक घरातल्या होममेकरला आपलीशी वाटणाऱ्या बटरफ्लाय या गोष्टीची संकल्पना मधुरा वेलणकर यांनी मांडली असून या संकल्पनेला विभावरी देशपांडे यांनी चित्रपटाच्या कथेत बांधल आहे.विभावरी देशपांडे आणि मीरा वेलणकर यांनी पटकथेच लेखन केल असून संवाद लेखन कल्याणी पाठारे आणि आदित्य इंगळे यांनी केलं आहे.मधुरा वेलणकर साटम, अभिजित साटम, महेश मांजरेकर,राधा धारणे, सोनिया परचुरे, प्रदीप वेलणकर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली आहे.ज्येष्ठ अभिनेते, नाट्यनिर्माते अजित भुरे प्रस्तुत आणि असीम एंटरटेन्मेंट आणि ॲप्रोग्रॅम स्टुडिओज निर्मित असणाऱ्या “बटरफ्लाय” चित्रपटात असणाऱ्या “कोरी कोरी झिंग हाय गं” या गीताचे सोशल मीडियावर लॉन्चिंग करण्यात आले.

वैभव जोशी यांच्या लिखाणातून साकार झालेले हे गीत गायिका वैशाली भैसने माडे यांनी गायील असून शुभाजित मुखर्जी यांनी संगीतबद्ध केेलं आहे.मीरा वेलणकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात बटरफ्लायच्या निमित्ताने पदार्पण केले आहे. या चित्रपटात एका गृहिणीने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा मनोरंजक प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.यावेळी या पत्रकार परिषदेस मीरा वेलणकर ,मधुरा वेलणकर यांच्यासह अभिजीत साटमही उपस्थित होते.

🤙 8080365706