
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (28 मे) दिल्लीतील नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी 7.30 पासून हवन आणि पूजेने या सोहळ्याला सुरुवात झाले आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात येणार आहे.

तर दुपारी मुख्य सोहळ्याला सुरूवात होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला ज्येष्ठ मंत्री, 25 राजकीय पक्षांचे सदस्य आणि धार्मिक नेत्यांसह अनेक मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.केंद्र सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत नवीन संसद भवन तयार करण्यात आले आहे. संसद भवन तयार करण्यासाठी 971 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
