
कोल्हापूर : भाजपा जिल्हा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उद्या रविवार दि.28/05/2023 रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न होत असल्याचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित असणार आहेत. भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्याच्या नूतन इमारतीचे निर्माण पूर्ण झाले आहे. शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नजीक, सर्वांना येण्यासाठी सोयीच्या ठिकाणी ही सुसज्ज इमारत सज्ज आहे.या कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक केंद्र व राज्य सरकारच्या योजना यांची माहिती मिळणार आहे त्याचबरोबर अनेक योजना पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांची टीम कार्यरत असणार आहे. सुसज्ज कॉन्फरन्स हॉल, जिल्हाध्यक्ष दालन, वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, सोशल मीडिया वॉर रूम, प्रशस्त पार्किंग, भाजपा पक्षाची सर्वांगीण माहिती देणारे ग्रंथालय अशा अत्याधुनिक पध्दतीने हे कार्यालय लोकांच्या सेवेसाठी सज्ज आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपा प्रेमी, हितचिंतक यांनी या कार्यक्रमासाठी सायंकाळी 5 ते 9 यावेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केले आहे.
