
वाईट जीवनशैलीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होते. योग्य आहार न घेणे, शरीराची हालचाल कमी होणे, फास्ट फूडचे सेवन करणे, या कारणामुळे शरीरात विविध वजन वाढते. तर जाणून घेऊया मिठाने वजन वाढते का?

मीठ कमी केल्याने किंवा पूर्णपणे सोडून दिल्याने वजन कमी होत नाही. शरीराचे कार्य व्यवस्थित चालवण्यासाठी आहारात मीठ असणे गरजेचं आहे. मीठामध्ये सोडियम जास्त प्रमाणात आढळते. आपण जर मीठ जास्त प्रमाणात खात असाल तर, शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते. ज्यामुळे वजन काही ग्रॅमने वाढू शकते. मीठ सोडल्याने जर वजन कमी होत असेल, तर ते कमी कालावधीसाठीच असते.”
मीठ कमी करून वजन कमी होत असेल तर, ही स्थिती जास्त काळ टिकत नाही. वजन जर कमी झाले असेल तर, आपल्या आहारातून मिठाचे सेवन कमी किंवा वगळावे लागेल. जर आपण पुन्हा मीठ खाण्यास सुरुवात केली तर, पुन्हा वजन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मीठ खाल्ल्यास वजन वाढत नाही. मिठामुळे फक्त वॉटर वेट वाढते. जे वर्कआउट केल्याने कमी होते. खारट पदार्थांमध्ये भरपूर कॅलरीज आणि फॅट्स असतात, ज्यामुळे वजन वाढते. वजन कमी करण्यासाठी सकस आहार व कॅलरीज इनटेक कमी करायला हवे. ज्यामुळे शरीरातील फॅट्स कमी होण्यास मदत होते.
