सोशल मीडियाच्या अती वापराने आजची तरुण पिढी बिघडत आहे : आलोक जत्राटकर

कोल्हापूर : आजच्या तरुणाईने सोशल मीडियाचा अतिवापर कमी केला पाहिजे .सोशल मीडियाच्या अती वापरामुळे आजची तरुण पिढी बिघडत आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी व्यक्त केले आहे.

युवा सेना ठाकरे गटाच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.कोल्हापूर जिल्हा व शहर युवासेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) यांच्या वतीने युवक-युवती यांच्यासाठी ‘सोशल मीडिया व ऑनलाईन च्या जमान्यात हरवत चाललेले नातेसंबध’ या विषयावर व्याख्यान न्यू कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आले होते. मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आजची तरुण पिढी बिघडत चालली आहे. आजकाल नातेसंबंधही बिघडत चालले आहेत. त्यामुळे आजच्या तरुणाईने सोशल मीडियाचा अतिवापर कमी केला पाहिजे असं यावेळी जत्राटकर म्हणाले.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, प्राचार्य वसंत पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी चैतन्य देशपांडे, रघु भावे उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे, युवासेना जिल्हा चिटणीस अमित बाबर, युवराज मोरे, योगेंद्र माने, वैभव जाधव, सुनील चौगुले,पवन तोरस्कर,प्रदीप हांडे यांच्यासह युवासेना पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 8080365706