
रत्नागिरी : भारतीय रेल्वेचा विस्तार गेल्या काही वर्षांत वेगाने सुरु आहे. भारतीय रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस देशभरात अनेक मार्गावरुन धावू लागली आहे. या गाडीची लोकप्रियता वाढत आहे. यामुळे अनेक ठिकाणी ती सुरु करण्याची मागणी होत आहे. आता राज्याला लवकरच आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहे.

मुंबई- गांधीनगर दरम्यान पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावू लागली. तसेच मुंबईवरुन शिर्डीसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली. आता चौथी गाडी लवकरच सुरु होणार आहे.
