
पुणे – राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही भाष्य केले आहे. लातूर दौऱ्यावर असताना सुप्रीम कोर्टाच्या निकालावर मी माझे मत मांडले होते. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे प्रकरण येईल असं मी म्हटलं होते. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नको होता, त्यानंतरही ते पद रिक्त ठेवणे आमची चूक झाली अशी कबुली अजित पवारांनी दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना विचारात घेतले नाही. तो राजीनामा दिल्यावर लगेच विधानसभा अध्यक्षाबाबत महाविकास आघाडीने घ्यायला हवा होता. पण तो विषय तातडीने निकाला लागला नाही. अनेक काळ विधानसभेचे उपाध्यक्ष कामकाज पाहत होते. सत्तांतर घडल्यानंतर भाजपा-शिवसेनेने तात्काळ विधानसभा अध्यक्षपद बहुमताने भरले, जर आमचा अध्यक्ष असता तर ही वेळ आली नसती, ते १६ आमदार त्यावेळीस अपात्र ठरले असते असं त्यांनी म्हटलं.
