
कोल्हापूर : राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल आज समोर आला. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने अनेक गोष्टींचा उल्लेख निकाल देताना केला आहे.

ज्यात उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून पुनर्स्थापित करण्याचा निर्णय दिला असता, असं न्यायालयानं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजीनामा देण्याच्या निर्णयाचा उल्लेख केला होता. संघर्ष न करता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यान महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला, अस स्पष्ट मत पवार यांनी व्यक्त केल होत. न्यायालयाने देखील निकाल देताना, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून पुनर्स्थापित करण्याचा निर्णय दिला असता, अस म्हटल आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा राजीनामा देण्याचा निर्णय मोठी चूक ठरली असल्याच स्पष्ट होऊन शरद पवारांचं ते वक्तव्य तंतोतंत खरं ठरलं आहे.
