आता पुनश्च हरिओम ; शरद पवार

सोलापूर : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा निर्णय मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. शरद पवार यांनी राज्यात आपले दौरे सुरू केले असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. नागरिकांशी संवाद साधत आहेत. शरद पवार यांनी सोलापुरातून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. दोन दिवसांपासून ते सोलापुरात आहेत. यावेळी त्यांनी एक मोठा निर्धार बोलून दाखवला आहे. आता पुनश्च हरिओम करायचं आहे.

वेगाने महाराष्ट्राचं चित्र बदलायचं आहे. हाच निर्धार मी मनाशी पक्का केला आहे, असं शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं मी राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते आणि हितचिंतक अस्वस्थ होते. त्यांच्यासाठी मला माझा निर्णय बदलावा लागला. निर्णय बदलावे लागले त्यात एक गैरसमज होता. मी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला याचा अर्थ संघटनेचं काम सोडलं नव्हतं. लोकांशी संपर्क करायचा ठरवलं होतं. पण तो गैरसमज झाला. आज तो दूर झाला याचा आनंद आहे, असं शरद पवार म्हणाले.

🤙 8080365706