
चंद्रपूर : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) घुग्घुस येथील अदानी समूहाच्या एसीसी सिमेंट कारखान्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

‘एनजीटी’च्या पुणे खंडपीठाने पर्यावरण उल्लंघनाशी संबंधित तक्रारींच्या चौकशीसाठी जिल्हा दंडाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची संयुक्त समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहे.तक्रारीत, सिमेंट कंपनी नागपूर, मुंबई, पुणे, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि बेंगळुरू येथून टाकाऊ कपडे, कालबाह्य औषधे आणि केसांची वाहतूक करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. प्लास्टिकचा कृषी कचरा जाळल्याने स्थानिक लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. कंपनीच्या या कृतीमुळे वर्धा नदीतील जलप्रदूषण झाल्याचा आरोपही करण्यात आला. रहिवासी आवारात ट्रकच्या पार्किंगमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होत असल्याची तक्रार होती.
