संजय राऊत काँग्रेसची दलाली करण्यासाठी इकडे येत आहेत : देवेंद्र फडणवीस

बेळगाव : संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली सोडली तर मी इकडे येणार नाही. राऊत काँग्रेसची दलाली करण्यासाठी इकडे येत आहेत ,अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर केली.

भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ बेळगावमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की, संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली सोडली तर मी इकडे येणार नाही. राऊत काँग्रेसची दलाली करण्यासाठी इकडे येत आहेत. त्यांचा मित्रपक्ष काँग्रेस आहे त्यांना सांगायला हवे होते की येथे उमेदवार उभे करू नये. काँग्रेसच्या सांगण्यावरून भाजपची मते कमी करण्यासाठी संजय राऊत दलाली करत आले.

🤙 8080365706