रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी मनाई आदेश करू नये

रत्नागिरी: शेतकऱ्यांच्या न्याय लढ्यासाठी कोणत्याही परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील बारसूमध्ये जाणार आहे. आपण मनाई आदेश करू नये, अन्यथा आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल. असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले.

राजू शेट्टी यांच्यामार्फत अॅड. असिम सरोदे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना हा इशारा दिला आहे. राजू शेट्टी यांना रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बारसूत भेट देण्यास मनाई आदेश काढला आहे. तसेच सोशल मीडियावरही कोणत्याही प्रकारचे पोस्ट करण्यास देखील मनाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटीशीला राजू शेट्टी यांनी उत्तर पाठवले आहे.नोटिसीला दिलेल्या उत्तरात राजू शेट्टी म्हणतात, राजू शेट्टी चळवळीमध्ये तसेच सक्रिय राजकारणात कधीच असंसदीय शब्दांचा वापर केलेला नाही. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ते नेहमीच लढा देत आले आहेत. तसेच त्यांना सोशल मीडियावरही प्रतिक्रिया देण्यास मनाई केली आहे. भारतीय राज्य घटनेने दिलेल्या अधिकारानुसार राजू शेट्टींना बारसू येथे जाण्यास तसेच प्रतिक्रिया देणेचा अधिकार आहे. त्यांच्या विरोधात काढण्यात आलेला आदेश बेकायदेशीर असून सदर मनाई आदेश तातडीने मागे घ्यावा अन्यथा आम्हाला तुमच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल. असे ते म्हणाले आहेत

🤙 8080365706