
कोल्हापूर : जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी राष्ट्रीय पंचायत राज दिनसाजरा करण्यात आला. यावेळी निर्धार संस्थेच्यावतीने सर्व विभागप्रमुखांना शुभेच्छा देण्यात आल्या.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्या दालनात झालेल्या कार्यक्रमामध्ये निर्धारच्यावतीने समीर देशपांडे यांनी सर्वांचे स्वागत केले. ते म्हणाले, १९९२ साली झालेल्या ७३ व्या घटनादुरूस्तीने पंचायत राज व्यवस्थेला बळ दिले. त्यानिमित्ताने २०१० पासून २४ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. कोल्हापूर जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील अव्वल संस्था असून कोल्हापूरने राबवलेल्या अनेक योजना राष्ट्रीय पातळीवर स्वीकारण्यात आल्या आहेत. यावेळी अजयकुमार माने यांनी निर्धारचे आभार मानून याहीपुढच्या काळात सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवण्यासाठी कटिबध्द आहेत असे मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकार चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार विकास कांबळे उपस्थित होते. प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपकघाटे, प्राथमिकशिक्षणाधिकारी आशा उबाळे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अरूणा हसबे, डॉ.उत्तम मदनेयांच्यासह अधीक्षक, उपशिक्षणाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
