पंचगंगा अन् भोगावती दोन्ही नद्यांनी गाठला तळ ; पाण्यासाठी नागरिकांची वणवण

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला पंचगंगा आणि भोगावती नदीतून पाणी उपसा केला जातो. पण आता याच दोन्ही नद्यांनी तळ गाठल्याने उपसा होण्यावर विपरित परिणाम झाला आहे.

उपसा पूर्ण क्षमतेने होत नसल्याने शहरातील पाणीपुरवठा गंभीर झाला आहे. थेट पाईपलाईन पाणी योजना अजूनही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कोल्हापूर शहरवासियांना भर उन्हात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्याचबरोबर कुंभी नदीने सुद्धा तळ गाठला आहे. कोल्हापूर शहरासाठी भोगावती नदीतून पाणी उपसा करण्यासाठी बालिंगा केंद्रात चार आणि नागदेववाडी केंद्रात दोन उपसा पंप आहेत. मात्र, नदीने तळ गाठल्याने उपसा बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न सुरु केल्यानंतर पाणी सोडण्यात आले आहे.

🤙 8080365706