राजाराम कारखान्याच्या निवडणुकीसाठी ६५ टक्के मतदान

कसबा बावडा : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (दि. २३) मतदान होत आहे. दुपारी १२ पर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान झाले.

छत्रपती राजाराम साखर कारखाना निवडणुकीसाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मोठा बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे. शीघ्र कृती दलांसह राज्य राखीव दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत. सात तालुक्यातील ५८ मतदान केंद्रांवर चुरशीने मतदान सुरू आहे.कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. छत्रपती राजाराम साखर कारखाना निवडणुकीसाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मोठा बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे. शीघ्र कृती दलांसह राज्य राखीव दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत. 

🤙 8080365706