पन्नास खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्यामुळे दाखल गुन्हा रद्द होण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका

छत्रपती संभाजीनगर: कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जळगाव दौऱ्यादरम्यान शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्यामुळे दाखल गुन्हा रद्द होण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेच्या अनुषंगाने न्या. मंगेश पाटील व न्या. अभय वाघवसे यांनी पोलिस प्रशासनाला तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला कारणे दर्शक नोटीस बजावली आहे. सरकारतर्फे ॲड. एस. डी. घायाळ यांनी नोटीस स्वीकारली. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार जळगाव जिल्ह्यात दौऱ्यावर गेले असता शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री सत्तार यांच्या ताफ्यावर कापूस फेकून, रिकामे खोके दाखवून ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशा घोषणा देत तीव्र निषेध नोंदवला होता.

🤙 8080365706