
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?
मेष रखडलेली कामे पूर्ण होतील होईल. महत्त्वपूर्ण निर्णय हे गुप्त ठेवा. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून मन समाधानी राहिल. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन उत्पनात वाढ होईल. व्यापारात आर्थिक दृष्ट्या प्रलंबित असणारी कामे पूर्णत्वास जातील. प्रशासकीय क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेतील व्यक्तींना विशेष लाभ होईल. पदप्राप्ती मानसन्मान मिळेल.
वृषभ व्यक्तिगत समस्याचा प्रभाव कामावर राहिल. काही अप्रिय घटनेमुळे त्रास सहन करावा लागेल. आर्थिक व्यवहारात सावधानी बळा. नोकरीत दुसऱ्यावर रोष करू नका. वाईट संगती पासुन सावध रहा. घरातील मौल्यवान वस्तु गहाळ किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. व्यवसाय रोजगारात मोठे परिवर्तन घडून देण्याची संभावनाआहे. आपले निर्णय चुकीचे ठरू शकतात.
मिथुन अपेक्षीत लाभ मिळेल. नोकरीत आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. व्यावसायिक स्पर्धेत यश मिळण्याची आज संधी आहे. राजकीय कला क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील. आर्थिक आवक वाढेल. आज आपल्या कामात उत्साह वाटणार आहे. बुद्धीचा वापर करुन पैशाची गुंतवणूक करा. प्रवास सुखकर व हितकारक ठरतील.
कर्क नवीन योजनेचा शुभारंभ होण्याचा योग आहे. व्यवसायात यश मिळेल. अनेक नवीन संधी नवीन मार्ग सापडतील. नोकरदार पत्नीकडून सहकार्य लाभेल. त्यांच्या बढतीचे योग आहेत. व्यापारात लाभ होऊन नफ्यात वाढ होईल. दूरवरचे प्रवास आनंददायक होतील. खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा.
सिंह वडिलांच्या तब्बेतीची काळजी घ्या. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण कराल. कुटुंबातून आपल्या कामास सहकार्य लाभणार नाही. निरर्थक कामात वेळ वाया घालवू नका. वेळेचा अपव्यय टाळा. शेअर मार्केट व्यापारात गुंतवणूक करण्यासाठी दिवस मध्यम स्वरूपाचा आहे. स्थावर मालमत्तेत काही अडचण येण्याची शक्यता आहे.
कन्या वरिष्ठांकडून नाराजी आढवून घ्याल. मानसिक स्वास्थ बिघडेल. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. शारिरीक व्याधी जुने आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. जीवनसाथीसोबत वैचारिक पातळीवर मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारिक प्रकरणात जबाबदारी वाढणार आहे. आपआपसातील वाद समझदारीने मिटवा.
तूळ समाजात व कुंटुंबात मानसन्मान मिळेल. नवीन योजना फायदेशीर ठरतील. व्यापारात काही नवीन भागीदारा सोबत संबंध प्रस्थापित कराल. गृहसौख्य जोडीदारा कडून सहकार्य लाभेल. प्रवासातून लाभ घडतील. जुणी येणी वसुल होतील. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगति होईल.
वृश्चिक तरूण तरुणीचे विवाह योग जुळतील. प्रेमप्रकरणात कुटुंबाच्या विरोधात जावून कठोर निर्णय घ्यावे लागतील. प्रिय व्यक्तीबरोबर अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. आपल्या संशयीवृत्तीवर आवर घाला. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायातील चिंते मुळे मन उदास राहील. कुंटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.
धनू आपल्या व्यसनांना आवर घाला. शारिरिक व्याधीचा कामावर विपरित परिणाम होईल. अपूर्ण राहिलेली कामे वेळेत पूर्ण करण्यास कसरत करावी लागेल. व्यापारात प्रतिस्पर्थ्यासोबत आव्हान निर्माण होईल. शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. सयंमी भूमिका घ्या. आळस झटकून कामाला लागा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे.
मकर आज मनोधैर्य वाढेल. रोजगारात प्रतिमा आणि प्रतिश्रा उचांवेल. कार्यात विशेष यश येईल. मुलांच्या बाबतीत प्रसन्नतापूर्वक वातावरण राहणार आहे. साहसी वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. उताविळपणा करु नका. नोकरी व्यापारात योग्य प्रतिसाद मिळेल. कुटुंबात शुभकार्याचे आयोजन केले जाईल. साहित्यिक समारंभात भाग घ्याल.
कुंभ वडिलोपार्जित इस्टेट वास्तू याविषयी कामे पार पडतील. नवीन घर खरेदीचा योग आहे. आपल्या वस्तुची देखभाल कराल. नोकरीत इच्छेप्रमाणे बदली किंवा बढ़ती मिळण्याचे योग आहेत. मित्र सहकारी यांची मदत मिळेल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी रहाल. नोकरीत आपण घेतलेले निर्णय योग्य राहतील. सामजिक प्रसिद्धि मिळेल.
मीन आपले कर्तुत्व सिद्ध कराल. पराक्रम व साहसी वृत्तीत वाढ होईल. व्यापारात नवीन संधी सोडू नका. नोकरीत एका नव्या समुहाशी आपला संबंध जुळण्याचा योग आहे. कुटुंबातील सदस्याकडून उत्तम सहकार्य लाभल्याने स्नेह वाढेल. हाती घेतलेल्या कार्यात यश संपादन कराल.स्वतःचे निर्णय स्वतः घेणे फायदेशीर राहील.
