
मुंबई: राज्य सरकार मराठा आरक्षणासंबंधी सकारात्मक असून त्यासाठी जे काही करता येईल ते करणार अशी माहिती राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात येणार असून एक नवा आयोग नेमून मराठा समाजाचा विस्तृत आणि शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येईल असंही ते म्हणाले. मराठा आरक्षणासंबंधी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर मरााठा आरक्षण उमसमितीची आज बैठक घेण्यात आली. त्यानंतर शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला.
