खंडोबा युवा मंचच्यावतीने ‘शिवजयंती उत्सव २०२३’ चे आयोजन

महिलांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या पुतळा पूजनाने उत्सवास प्रारंभ

कोल्हापूर : तिथीनुसार होत असलेल्या शिवजयंतीचे औचित्यसाधून कोल्हापूरमधील छत्रपती शिवाजी पेठ येथील श्री खंडोबा तालीम मंडळ प्रणित खंडोबा युवा मंचच्यावतीने ‘शिवजयंती उत्सव २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे.

या उत्सवानिमित्त मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.या उत्सवाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे गुरुवार दि. २० एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी 6 वाजता परिसरातील महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी परिसरातील महिलांची संख्या लक्षणीय होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषानी परिसर शिवमय झाला. यावेळी मंडळाचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिवभक्त मोठ्या संखेने उपस्थित होते. यानंतर श्री स्वामी समर्थ भजनी मंडळतर्फे रात्री 8 वाजता सोंगी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दि. २१ रोजी सायंकाळच्या सत्रात परिसरातील महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आणि लहान मुलांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा होणार आहेत.

दि. २२ रोजी सकाळी ७ वाजता किल्ले रांगणा येथून आणलेल्या प्रज्वलित शिवज्योतीचे आगमन आणि पूजन होणार आहे. तसेच परिसरातील महिलांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. यानंतर सायंकाळी ४ वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दि. २३ रोजी शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके होणार असून सायंकाळी आयोजित केलेल्या आतषबाजीने या शिवजयंती उत्सवची सांगता होणार आहे. यावेळी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.

🤙 8080365706