
कोल्हापूर : पँनल जाहीर होउन कांही तास होण्यापूर्वीच शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील शिव शाहू परिवर्तन पँनेलमधील शिवसेना ठाकरे गटाच्या एका उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे.
सुरेश आनंदा पोवार असे त्यांचे नाव आहे.रा.सातारडे ता.पन्हाळा येथील ते रहिवासी आहे. गुरुवारी रात्री या पँनेलने उमेदवारांची घोषणा केली आहे.शिवसेना शिंदे गट तेथे आम्ही सोबत नाही. अशी भूमिका त्यानी व त्यांच्या नेत्यांनी घेतली आहे.या घटनेनंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.खरे तर उमेदवार निवडताना शिवसेना शिंदे गटाने आपल्या उमेदवारांना जास्त प्रमाणात संधी देत हाय जँक केल्याचा आरोप होत आहे।आता शिव शाहू पँनेल.पँनेलमधील बलाढ्य नेते काय भूमिका घेणार या कडे कार्यकर्ते लक्ष देउन आहेत.
