लोकसंख्येच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर

मुंबई : भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात भारताने या बाबतीत चीनला मागे टाकले आहे. भारताची लोकसंख्या एका वर्षात 1.56 टक्क्यांनी वाढली आहे.

अहवालानुसार, आता भारताची लोकसंख्या 142.86 कोटी झाली आहे तर चीन 142.57 कोटींसह दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. UN च्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या एका वर्षात 1.56 टक्क्यांनी वाढली आहे.या अहवालात भारताचा एकूण प्रजनन दर 2.0 असल्याचे सांगण्यात आले. येथे भारतीय पुरुषाचे सरासरी आयुष्य 71 वर्षे आहे, तर महिलांचे 74 वर्षे आहे. हा अहवाल 1978 पासून प्रसिद्ध होत आहे. यूएनएफपीए भारताच्या प्रतिनिधीने सांगितले की, आता जगाची लोकसंख्या 8 अब्जांवर पोहोचली आहे.

🤙 8080365706