
मंचर (जि. पुणे) : मंचर बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकसंघ असणाऱ्या आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसध्ये गटबाजी उफाळून आली आहे.बाजार समितीचे सभापती आणि शिरूर लोकसभेची निवडणूक लढवलेले माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक देवदत्त निकम यांनाच उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे.
देवदत्त निकम यांनी मात्र आपण दिलीप वळसे पाटील यांचा फोटो वापरून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीसाठी राष्टवादी कॉंग्रेस पक्षाने बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रथमच बंडखोरीचे ग्रहण लागले आहे.
