
कोल्हापूर :कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. काँग्रेस -राष्ट्रवादी चे नेते आमदार सतेज पाटील, आम.पी एन पाटील, आम.हसन मुश्रीफ यांच्याविरोधात पुन्हा एकदा धनंजय महाडिक , राजेश क्षीरसागर,माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, समरजित सिंह घाटगे यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांनी शड्डू ठोकला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी ने काल बुधवारी पॅनेल जाहीर केले होते. त्यापाठोपाठ आज भाजप शिवसेना, शिवबाटा या तिघांनी शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडी करून त्यांच्या पॅनेलची घोषणा केली.
उमेदवार असे विकास सेवा संस्था गट भाजप महाडिक गटरणजित वसंत पाटील ,चुये ता.करवीर ,शिवसेना नरके गट बाजीराव सदाशिव पाटील वडणगे,शिवसेना नरके गट किरण गोविंद पाटील महे ,शिवसेना ठाकरे गट सुरेश आनंद पोवार सातार्डे ,राष्ट्रवादी बाबासाहेब असूर्ले गट अर्जुन महादेव चौगले पोर्ले,भाजप राहुल देसाई गट प्रताप भैरू मेंगाने बामणे तालुका भुदरगड व बळवंत सदाशिव पाटील चंद्रे तालुका राधानगरी,महिला प्रतीनिधी भाजप महाडिक गट कविता शाहू चव्हाण द.वडगाव,शिवसेना नरके गट अरुणा अशोक पाटील पाडळी बु.,इतर मागासवर्ग ठाकरे सत्यजित पाटील गट अनिल वायकुळ अंबा, भटक्या विमुक्त राहुल देसाई गट मधुकर गणपती पाटील मोरेवाडी तालुका भुदरगड, ग्रामपंचायत सदस्य गट नरके गट संजय जाधव हणमंतवाडी तालुका करवीर,ठाकरे सत्यजित पाटील गट सुरेश पाटील पिरळे तालुका शाहूवाडी, भाजप समरजित घाटगे गट समाधान म्हातुकडे सोंनाळी, आरपीआय आठवले गट उत्तम कांबळे गोरंबे तालुका करवीर, अडते व्यापारी शिवसेना क्षीरसागर गट नंदकुमार वळंजू व अमर क्षीरसागर ,तोलाई गट हमाल सत्यजित पाटील गट राजाराम जगताप कुराडवाडी तालुका पन्हाळा अशी नावे आहेत.
