
कोल्हापूर : कोल्हापूर कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्याचा परिणाम कर्नाटकचा सीमा भाग असलेल्या कोल्हापूरमध्येही दिसून येत आहे. आता कर्नाटकात सत्ताधारी भाजप आमदाराकडे मोठी रक्कम सापडली आहे. या प्रकरणी त्यांच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्नाटकातील रामदुर्गचे भाजप उमेदवार चिक्करेवन्ना यांच्याशी संबंधित गाडीत आढळली एक कोटी 54 लाखांची रोकड सापडली आहे. पोलिसांनी ही रोकड केली जप्त केली आहे. तसेच अनधिकृत रोकड प्रकरणी चिक्करेवन्ना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक निवडणूक जशी जवळ येत आहे, तशी अनधिकृत रक्कम मोठ्या प्रमाणावर मिळत आहे.कर्नाटकातील रामदुर्गचे भाजप उमेदवार चिक्करेवन्ना यांच्याशी संबंधित गाडीत कोट्यवधींची रक्कम सापडल्यानंतर आयकर विभागाने कारवाई सुरु केली आहे. ही रक्कम कुठून आली आणि कुठे जात होती, ही माहिती पोलिसांकडून घेतली जात असताना हा काळा पैसा आहे का? याचा शोध आयकर विभाग घेत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर रोकड सत्ताधारी आमदाराकडे सापडल्याने खळबळ उडली आहे.
