
कोल्हापूर : मराठा क्रांती ठोक मोर्चातील काही लोक नाराज असल्यामुळे त्यांनी बैठकीत गोंधळ घालाायचा प्रयत्न केला. यावेळी भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात नारेबाजी देखील करण्यात आली.तर चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उप समितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करा अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील हे केवळ समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उप समितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करा अशी मागणी यावेळी सर्व समन्वयकांनी केली. त्यामुळं गोंधळ निर्माण झाला आहे.मंगळवारी (18 एप्रिल) मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीला अध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. बैठकीमध्ये मराठा समाजाच्या समन्वयकांनी चंद्रकांत पाटील यांना अनेक प्रश्न केले. मात्र, पाटील यांना त्याची उत्तरे देता आली नाहीत.
