ग्रामपंचायत गारगोटीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करणेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेकडून विद्यमान सरपंच व सदस्यांना नोटीसा : गटविकास अधिकारी गावडे

आंदोलनकर्त्यांना सरपंच व सदस्यांना आलेल्या नोटीसीची प्रत देताना गटविकास अधिकारी शंकर गावडे.

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील गारगोटी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सत्ताधारी मंडळींनी मागील 5 वर्षाच्या कार्यकाळात कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला असून याबाबत विरोधी आघाडीच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. त्या त्याबाबत कोणतीही चौकशी झालेली नसल्यामुळे विरोधी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने आज तहसील कार्यालय भुदरगडच्या बाहेर लाक्षणिक उपोषण केले होते. याआंदोलनास गटविकास अधिकारी शंकर गावडे पंचायत समिती, भुदरगड यांनी भेट दिलेनंतर आपण दिलेल्या तक्रारींची दखल घेवून तपासणी वजा चौकशी अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांना पाठविला होता. त्या अहवालानुसार विद्यमान सरपंच व सदस्यांना नोटीस लागू केल्या असल्याची लेखी माहिती गटविकास अधिकारी शंकर गावडे यांनी उपोषणकर्त्यांना देऊन उपोषणकर्त्यांनी सरबत देऊन उपोषणाची सांगता केली.

सदर आंदोलनावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गारगोटी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सत्ताधारी मंडळींनी चुकीच्या पध्दतीने कामकाज केले आहे. यामुळे गारगोटी शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष झालेले आहे. गावातील अनेक मुख्य प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत.

गारगोटी शहराच्या विकासासाठी 15 वा वित्त आयोग, स्वनिधी तसेच अपंग कल्याण निधी, महिला व बालकल्याण यासह विविध फंडातून विकासकामांकरीता मंजूर झालेल्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. तसेच ग्रामपंचातीचे बोगस बँक खाते उघडून त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचे म्हटले आहे. यावेळी आंदोलनास अंकुश चव्हाण, बाजीराव चव्हाण, माजी उपसरपंच अरुण शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख संग्राम सावंत, माजी सरपंच छाया सारंग, रुपाली राऊत, सरिता चिले, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव मोरे, रणधिर शिंदे, सुशांत सुर्यवंशी, सदस्या अनिता गायकवाड, स्मिता चौगले, अरविंद चौगले, अल्ताफ बागवान, माजी ग्रा.पं.सदस्य बी.के.कांबळे, मनोहर परीट, महेश सुतार, दिपक मोरे, दिपक देसाई, दिलीप देसाई, सागर शिंदे, प्रशांत भोई, जितेंद्र भोसले, पांडूरंग कांबळे, रोहित देसाई आदी उपस्थित होते.

🤙 8080365706