उच्च न्यायालयाकडून दाभोलकर कुटुंबियांची मागणी अमान्य…

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपास आणि खटल्यावर न्यायालयाने देखरेख कायम ठेवण्याची मागणी दाभोलकर कुटुंबियांकडून करण्यात आली होती.तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी संबंधित तपासावर देखरेख कायम ठेवायची की नाही.याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. मात्र, आता दाभोलकर हत्या प्रकरणाच्या तपास आणि खटल्यावर देखरेख कायम ठेवण्याची आवश्यकता नाही असं स्पष्ट करत उच्च न्यायालयाने मंगळवारी दाभोलकर कुटुंबियांची मागणी अमान्य केली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या तपास आणि खटल्यावर न्यायालयाने देखरेख कायम ठेवण्याची मागणी केली होती. तर विक्रम भावे आणि वीरेंद्र तावडे या आरोपींनी हस्तक्षेप याचिका करून प्रकरणावर न्यायालयाने देखरेख ठेवण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं होतं. आता या प्रकरणी उच्च न्यायालयानं महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.

🤙 8080365706