शासन निर्णय रद्द झाले नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा : डॉ भारत पाटणकर

कोल्हापूर : सात तारखेपर्यंत दोन्ही शासन निर्णय रद्द झाले नाहीत तर आठ तारखेपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डॉ. भारत पाटणकर यांनी धरणग्रस्तांच्या आंदोलनाच्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाच्या वेळी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हे जे प्रकल्पग्रस्तांच्यावर अन्याय करणारे शासन निर्णय काढले आहेत, ते रद्द करून पुनर्वसनाला चालना देणारे शासन निर्णय काढले पाहिजेत आणि या ठिकाणी बसलेल्या प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करण्याचा मार्ग मोकळा केला पाहिजे.

असे झाले नाही तर आंदोलन मागे घेतले जाणार नाही. तसेच सहा तारखेला असणाऱ्या होळीच्या दिवशी आंदोलक आंदोलन स्थळीच होळी साजरी करून सरकारच्या नावाने बोंब ठोकतील आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख कपाळाला लावून आंदोलनाचा पुढील टप्पा जाहीर करतील असेही ते म्हणाले.

यावेळी मारुती पाटील, संतोष पाटील, बाळू पाटील, पांडुरंग पोवार, विनोद बडदे ,नजीर चौगुले आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 8080365706