धनंजय मुंडेंवर २५ जेसीबी मधून फुलांची उधळण

परळी : राष्ट्रवादीचे आमदार, माजी मंत्री धनंजय मुंडे हे अपघातातून बरे होऊन महिनाभरानंतर परळी या आपल्या मतदारसंघात परतले. त्यामुळे परळीत समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.डीजे, विद्युतरोषणाई आणि पंचवीस जेसीबीमधून फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आले. मुंडे आज मुंबईहून परळीत परत येणार हे माहित असल्यामुळे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी समर्थकांकडून करण्यात आली होती. क्रेनवर एक भला मोठा हार लावण्यात आला होता. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तब्बल २५ जेसीबी उभे करून त्यातून मुंडेंवर फुलांची उधळण करण्यात आली.

मुंडे कार्यक्रमस्थळी आले तेव्हा डीजेच्या तालावर समर्थक मनसोक्त नाचत होते.४ जानेवारी रोजी परळी शहरात मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातात झालेल्या दुखापतीतून बरे होवून आज पहिल्यांदाच ते परळीत दाखल झाले. तत्पुर्वी त्यांनी गहिनीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतले. परळीत दाखल होताच त्यांनी आपले वडिल स्व. पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले.

🤙 8080365706