
बालिंगा : बालिंगा तालुका करवीर येथे नदीजवळ कचरा डेपोच्या समोर ऊसाचे शेतामध्ये एका ऊसतोड मजुराने आपल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केला आहे.

सदर घटनेची नोंद करवीर पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आली आहे. या वेळी समजले माहिती अशी की, स्नेहल दीपक ऐवळे व 24 राहणा खडके मंगळवेढा यांचा खून झाला असून त्यांचे पती दीपक ऐवळे यांनी आज सकाळी करवीर पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर होऊन खुनाची कबुली दिली आहे. दीपक हा स्नेहलच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता त्यांच्यात नेहमी वादावादी होत होती.त्यातूनच दोघेजण बालिंगा तालुका करवीर येथील कचरा डेपो समोरील ऊसाच्या शेतामध्ये त्यांनी मुक्काम केला होता. आज दिनांक ७ फेब्रुवारी रोजी पहाटे चरित्राच्या संशयामधून दोघांमध्ये खूप भांडण झाले.
त्यानंतर थोड्यावेळाने पत्नी झोपी गेली ते पाहून संतापलेल्या दीपक ने मोठा दगड पत्नीच्या डोक्यात मारून तिचा खून केला आणि सकाळी करवीर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन स्वतः हजर झाला. याची नोंद करवीर पोलीस स्टेशनला झाली असून पुढील तपास चालू आहे.
