आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष :आज आपल्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे. प्रतिभेस वाव मिळेलं. कला क्षेत्रातील व्यक्तींकरिता उत्तम योग आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतुक होऊन मान सन्मान वाढेल. नोकरीत बढती मिळेल. वरिष्ठांकडून मोठी जबाबदारी मिळू शकेल. व्यापारवर्गासाठीही अनुकुल वातावरण आहे. धनप्राप्तीत वाढ होईल.

वृषभ: आज कलह, वादविवादाचे पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. चतुर्थातून हे भ्रमण होत असल्याने वाहन घर खरेदी व्यवहार टाळा.मानसिक दृष्या पीडादायक दिनमान आहे. नोकरीत कामाचा ताण वाढेल. शासकीय कर्मचारी असाल तर खोट्या प्रकरणात गुंतले जाल. व्यापारउद्योगात व्यवहार जपून करावेत.आर्थिक हानी संभवते.

मिथुन :आज शुभ दिवस आहे. बौधिक क्षेत्रात कार्यरत असणाया व्यक्तीकडून उत्तम कार्य घडतील. विद्वत्तेत वाढ होईल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. राजाश्रय मिळेल. सामाजिक व्यक्तींना पद, मानसन्मान वाढेल. भातृसौख्यच उत्तम लाभेल. भांवडाकडून मोठं सहकार्य मिळणारआहे. नोकरी, व्यवसायात भरभराटीचा दिवस आहे.

कर्क :आज धनलाभ, आर्थिक उत्कर्ष, उत्पनात वाढीच्या दृष्टीने अत्यंत उत्तम दिनमान आहे. संधीचा फायदा घ्या. केतूच्या नक्षत्रातील भ्रमण आकस्मिक धनलाभ घडवेल. शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी, व्यापार दोन्हीकरीता नवीन संधी मिळतील. त्यातून निश्चित लाभ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

सिंह :आनंददायी, मनात प्रसन्नता राहील. शुभवार्ता ऐकायला मिळतील. नोकरीत प्रगती होईल. उत्पन्नात वाढ होईल. आपण हाती घेतलेल्या कार्यात यश प्राप्ती होईल. व्यापारीवर्गातील उत्त्पन्नात वाढ होईल. मोठे प्रकल्प मार्गी लागतील. नवीन व्यवसायाची सुरुवात करा. चांगल्या कल्पक योजना मांडा. आज यश प्राप्त होईल. मित्रपरिवारांकडून उत्तम सहकार्य मिळेल. मनाप्रमाणे घटना घडतील.

कन्या :आज आपल्या चिंता निर्माण करणारा दिवस आहे. मनोबल फारसे चांगले राहणार नाही. मानसिक त्रास व कटकटी वाढतील. बरेच काही करण्याची इच्छा राहील. पण आज धोका पत्करू नये. नोकरीत नवनवीन कल्पना येत असल्या तरी बरेच काही गमवावे लागेल. चितन व कर्मयोग महत्वाचा आहे. व्यवसायात नवीन गुंतवणूक करू नये आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे.उत्पन्नापेक्षा अधिक खर्च असी स्थिति आज राहणार आहे.

तूळ : दिनमान उत्साहवर्धक राहील. नवीन व्यवसायिक घटना घडणार आहे. आर्थिक दृष्या खुपच चांगला काळ आहे.वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील.नवे मित्रमैत्रिणी भेटतील. नवीन वस्तुबाबतचा विचार आग्रहाने पुढे येईल व निर्णय घेतला जाईल. संततीकरिता आजचा दिवस उत्सहाचा आहे.प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल.

वृश्चिक: आज आपल्या योजना सफल करणारा दिवस आहे. संकुचित मनोवृति टाळा.उत्साहाने काम करा. यश निश्चित लाभेल. प्रयत्नांना वेग येईल. नोकरीत नवीन योजना प्रकल्प कार्यान्वित होतील. ग्रहयोगाचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल.नव्या बौद्धिक कल्पनाबरोबरच नव्या विचारांचा मनावरचा प्रभाव वाढेल.

धनु: आजचा दिवस भाग्यकारक आहे. मनात प्रसन्नता राहील. आध्यात्मिक वातावरणात रमाल. देवधर्मासाठी खर्च कराल. आत्मसुख आणि आनंदाची प्रचिती घ्याल. आध्यात्मिक प्रगतीला पोषक दिवस आहे.नोकरी, व्यवसायात काही तरी चांगले करावे अशी मानसिकता निर्माण होईल. सरकारी कामकाजाचे प्रश्न मार्गी लागतील. अविवाहितांना विवाह योग आहे.

मकर: आजचा दिवस कष्टदायक आहे. आज विचारपूर्वक निर्णय घ्या. पैशाच्याबाबतीत फसवणूक होण्याची शक्यता आहे. प्रश्न निर्माण होतील. आपल्यावर संशय घेतला जाईल. मनस्ताप होईल. सुखात अडथळे निर्माण होतील. मनस्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. साडेसातीच्या तृतीय चरणातील प्रभावामुळे नोकरी, व्यवसायात बऱ्यापैकी ताणतणाव जाणवेल.

कुंभ: केंद्रातून होणारं गोचरीय चंद्रभमण पत्नी कौटुंबिक सौख्य उत्तम मिळणार आहे. प्रसन्नता पूर्वक दिवस व्यतीत होईल.घरात नातेवाईकांचे आगमन होईल. संततीकडूनही समाधानकारक स्थिती राहील. आज स्वताःवरचा विश्वास वाढेल. नोकरी व्यवसायात नवीन जबाबदारी येतील. सहकाऱ्यांची साथ लाभेल. भागीदारीत उत्तम सहकार्य लाभेल. सरकारी कामात यश येईल. वातावरण अनुकुल आहे.

मीन: आपल्या आरोग्याबाबतीत समस्या निर्माण होतील. प्रकृती अस्थिर राहील. मनस्वास्थ्य बिघडेल. नोकरी, व्यवसायात एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. बौद्धिक आणि भावनिक गोंधळ उडेल. थोडेफार नैराश्य देणारा दिवस आहे. गैरमार्गाचा अवलंब टाळा. अंगलट येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखादया सदस्यावर आरोग्य, औषध यावर खर्च वाढेल. 

🤙 8080365706