वंदे भारत एक्सप्रेस ने रचला इतिहास….

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं वंदे भारत एक्सप्रेस दाखल झाली असून वंदे भारत एक्सप्रेसने मुंबईला येत असताना एक इतिहास रचला आहे.

इतिहासात पहिल्यांदाच एखादी गाडी कोणत्याही प्रकारचे बँकर इंजिन न लावता लोणावळाआणि खंडाळा येथील बोरघाट उतरून आली आहे. येणाऱ्या काळात देखील या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस कसारा येथील थल घाट आणि लोणावळा येथील भोर घाट कोणतेही बँकर इंजिन न लावता चालवल्या जाणार आहेत. त्यासाठी या अत्याधुनिक अशा ट्रेनमध्ये विशेष पार्किंग ब्रेक्स लावण्यात आले आहेत, जेणेकरून उतार आणि चढाव यावर ही गाडी अपघातग्रस्त होणार नाही.

🤙 8080365706